भुसावळात जन्मोत्सवानिमत्त तापी मातेला 150 मीटर लांबीचे महावस्त्र अर्पण

तापीच्या जन्मोत्सवानिमित्त पूजा करून खणा-नारळाने भरली ओटी


भुसावळ : तापी नदीचा शनिवारी जन्मोत्सव भाविकांनी साजरा केला. शनिवारी सकाळी 11 वाजता इंजीन घाटावर तापी नदीची पूजा करून नदीची खणा-नारळाने ओटी भरून 150 मीटर लांबीचे महावस्त्र नदीला अर्पण केले. यावेळी शहरातील भाविकांची मोठी गर्दी नदीवर झाली.

तापीचा जन्मोत्सव उत्साहात
बैतुलमधून उगम झालेल्या तापी नदीने खानदेशातील शेतीच नाही तर समाज जीवन समृद्ध केले आहे. जीवनदायी तापी नदीचे शहराला वरदानच लाभले आहे. नदीचे उपकार लक्षात घेत तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती, सखी श्रावणी महिला बहुद्देशीय संस्था, सप्तशृंगी माता बहुद्देशीय संस्था, अग्रवाल महिला मंडळ भुसावळ, जय लेवा ग्रुप तसेच नॅशनल युथ क्लब भुसावळ या सहा स्थानिक संस्थांनी पुढाकार घेत शनिवारी म्हणजे आषाढ शुद्ध सप्तमी तापी नदीचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला. शनिवारी दुपारी 12 वाजता इंजिन घाटाजवळ तापी नदी पूजन पंडीत जयप्रकाश शुक्ला यांनी केले. पूजेसाठी यजमान प्रशांत वैष्णव सपत्नीक बसले होते. त्यांच्यासोबत अग्रवाल महिला मंडळाच्या पदाधिकारी, सखी श्रावणी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तापी नदीची विधीवत पूजा अर्चा करून तसेच खणा नारळाने ओटी भरून तापी मातेला 150 मीटर लांबीचे महा महावस्त्र (23 साड्या एकमेकांना जोडलेल्या) अर्पण करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.


तापी नदीची दिली माहिती
पतापी पूजन झाल्यावर प्रा.डॉ.दयाधन राणे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर यांनी तापी नदीची व नदीचे भौगोलिक तसेच सामाजिक महत्व सांगितले तर नदीचे अध्यामिक महत्व प्रशांत वैष्णव यांनी सांगितले. शनिवारी सकाळी 10 वाजेपासूनच तापी नदीवर शहरातील महिलांनी गर्दी केली होती. तापी नदीची पूजा करून अनेक महिलांनी दीपदान केले. नदीत दिवे सोडले. नदीचे पूजन केले. अनेक महिलांनी सोबत आणलेली ओटी नदीला अर्पण केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी मेघा वैष्णव, नंदा अग्रवाल, श्रावणी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नेवे उपस्थित होत्या. यावेळी गोपाळ नगर, गांधी नगरातील शिवहर निळकंठ महादेव बहुउद्देशीय संस्थेतर्फे सुध्दा तापी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनुजा मायकल, अंजु चापरे, सुनील शर्मा, शारदा कोतवाल उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !