वारकर्यांच्या बसला भीषण अपघात : पाच वारकरी ठार
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनार्थ निघालेल्या भाविकांच्या खाजगी ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकरी ठार झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात मंगळवार, 16 रोजी घडला.
ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात
54 वारकरी पंढरपूरकडे जात असताना मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणार्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रीत होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी आहेत, तर 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

पाठीमागून ट्रॅक्टरवर धडकली बस
ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.11 बी.झेड.2286) वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (28, उत्तर प्रदेश) हे मुंबई पुणे महामार्गावर नो एन्ट्री मध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवीत घेऊन जात होते. यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच.02 एफ.जी.9966) वरील चालक संजय पाटील (54) यांनी भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचे नादात ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली व त्यानंतर
ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर वरील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीच ठार झाले. बस ही ट्रॅक्टरला ठोकर मारून डाव्या साईटच्या रेलिंग तोडून 10 ते 15 फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली.
