गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : खासदार संजय राऊत


मुंबई : खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टिका करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक जवान शहीद झाल्याने या प्रकरणांची जबाबदारी घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी केली आहे.

गृहमंत्री अपयशी
संजय राऊत म्हणाले की, ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्याच दिवशी काश्मीरमध्ये सर्वांत मोठा हल्ला झाला. अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसले आहेत. किंवा राजकारणात व्यस्त आहेत. अमित शहा देशातील निवडणुका इतर उद्योग, रोखे जमवणे, धमक्या देणे यामध्ये व्यस्त आहे.



ती ताकद जम्मू मणिपूरमधये का लावत नाही ?
देशाचे दुश्मन मोकाट आहेत. अमित शहा राजकीय विरोधकांना शत्रू मानतात. त्यांनी आपल्या जवानांची हत्या करणार्‍यांना देशाचे दुश्मन समजलं पाहिजे. त्यांनी विरोधकांना संपवण्यासाठी जी ताकद लावली तीच जम्मू आणि मणिपूरमध्ये लावली असती तर शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांना हत्या पाहण्याची वेळ आली नसती, नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. हत्या म्हणतोय मी, बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा. अमित शहा हे अपयशी गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !