चोरीच्या दोन दुचाकींसह चोटे रामानंद पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : गस्ती करत असताना पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने दोन संशयितांना हेरले. अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात चोरीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. दोघांना ताब्यात घेत रामानंदनगर पोलिसांनी अटक केली.ही कारवाई गुरुवार, 18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास केली.

चोरीच्या दोन दुचाकी जप्त
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्सटेबल जितेंद्र राठोड, सहायक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, उमेश पवार हे गुरुवारी रात्री हद्दीत पेट्रोलिंग करत होते. मध्यरात्रीनंतर रायसोनीनगरात दोन संशयित दुचाकीने वावरत होते. दोघांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर प्रेम संजय बडगुजर (20, अयोध्यानगर) तसेच अविनाश दिनकर बागुल (27, रा.नगरदेवळा) असे संशयितांनी नावे सांगितले.

मुंबईहून चोरली दुचाकी
संशयितांकडे पल्सर ( क्रमांक एमएच 02 टीजी 4941) तसेच पल्सर (क्रमांक एम.एच.19 डी.जी.8050) ही वाहने चोरीची असल्याची कबुली दिली. त्यात एक दुचाकी रामानंदनगर हद्दीतील तर अन्य एक मुंबई येथील चोरीची असल्याची माहिती तपासातून समोर आली. पोलिसांनी दुचाकीसह दोघा संशयितांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांच्या तक्रारीनुसार गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !