भुसावळात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे विद्यार्थिनींना छत्री वाटप


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटी नगरपरिषद संचलित म्युन्सिपल हायस्कूलमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासह छत्री वाटप रकण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, इनरव्हील क्लब अध्यक्ष मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, विणा झवर, छाया बर्‍हाटे, राधा राठोड, शीतल भराडे आदींची उपस्थिती होती.

प्रोजेक्ट चेअरमन सुनीता पाचपांडे, संध्या धांडे, मृणाल पाटील, मेघा वाणी, योगीता वायकोळे, कविता पाचपांडे, अनिता महाजन, पल्लवी मुळे, रंजना यावलकर, नीता अहिरराव यांच्याहस्ते गरजू विद्यार्थिनींना छत्रीवाटप करण्यात आल्या. नगरपरिषद संचलित म्युन्सिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनी सहकार्य केले. प्रदीप साखरे सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी शिवलाल चुन्नीलाल आयुर्वेदिक भांडारचे सहकार्य लाभले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !