ई पास मशीनला अडचणी : 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवा

स्वस्त धान्य दुकानदार संघटनचे भुसावळ तहसीलदारांना निवेदन


भुसावळ : भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदारांना नीता लबडे यांना निवेदन देण्यात आले. ई पॉस मशीनबाबत होणार्‍या अडचणी दूर करून दुकानदाराना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

जुलैच्या वाटपासाठी मुदतवाढीची मागणी
ई पॉस मशीनमध्ये अडचणी येत असल्याने सर्व दुकानदारांना धान्य वाटप व ई केवायसी करताना मशीन वारवार बंद पडते व कार्ड धारकाचा अंगठा लागत नाही व सर्व्हर समस्या येते त्यामुळे रेशन दुकानामध्ये कार्ड धारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे स्वस्त धान्य दुकानात वाद निर्माण होत असतात आणि काही कार्ड धारकांना मशीनबाबत समजत नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीकडे केली जाते व दुकानदाराविषयी गैरसमज निर्माण होतो. मशीनबाबत येणार्‍या अडचणी सोडवाव्यात व दुकानदारांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली. जुलैच्या वाटपासाठी भुसावळ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !