भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात पुस्तक प्रदर्शन
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात महावाचन उत्सवाच्या अंतर्गत पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी.धाडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, विद्यालयाचे ग्रंथपाल व्ही.टी.भंगाळे उपस्थित होते. यानिमित्त वायकोळे व डी.बी.धाडी यांनी विविध पुस्तकांचे अवलोकन केले.

