पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन संचलित आरोग्यदूतपदी नियुक्ती
भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती स्व. अशोक पंडित पाटील यांचे चिरंजीव पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयाच्या आरोग्यदूत (भुसावळ तालुका प्रमुख) या पदावर नियुक्ती करण्यात आली.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल पत्रकार हर्षल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

