जम्मू काश्मिरसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ? आज निवडणूक आयोगाची पत्रपरिषद !


Maharashtra assembly election bugle will sound with Jammu and Kashmir? Election Commission press conference today! मुंबई (16 ऑगस्ट 2024) : सर्वोच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका आयोजित करण्याबाबत आदेश दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू आणि काश्मीरसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 90 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजणार का ? याकडेही राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राचा आज बिगुल वाजणार !
महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खर्‍या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोग दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात.


अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या काही अधिकार्‍यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरला अलीकडेच भेटही दिली . त्यानंतर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची बुधवारी बैठक झाली. निवडणुकीदरम्यानच्या सुरक्षेबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन वाजता फक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले जात आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग नेमकं कोणत्या राज्यांसाठी निवडणुका जाहीर करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !