मालेगाव शहरातून 34 सराईत गुन्हेगार दहा दिवसांसाठी हद्दपार
34 Sarai criminals deported from Malegaon city for ten days मालेगाव (17 ऑगस्ट 2024) : शहराची शांतता धोक्यात आणण्याची शक्यता असलेल्या 34 सराईतांना मालेगाव शहरातून दहा दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. प्राणघातक हल्ले, खून, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे वाढल्याने अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी हिस्ट्रीशिटरांच्या गुन्हेगारी कुंडल्या जमा केल्या आहेत.
34 संशयीतांना शहरबंदी
कोम्बिंग ऑपरेशन हाती घेत यातील सराईतांची झाडाझडती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी शहर विभागातील 400 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. चार दिवसात 260 गुन्हेगारांचा शोध घेत त्यांची झाडाझडती घेतली. शोध मोहिमेत 41 संशयित सध्या कारागृहात असल्याचे आढळून आले. संशयितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 15 ऑगस्ट, रक्षाबंधन सणांच्या पार्श्वभूमीवर 34 गुन्हेगारांना 25 ऑगस्टपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवायांचे शहरवासीयांमधून स्वागत केले जात आहे.

कोम्बिंग ऑपरेशनमुळे काही वर्षांपासून फरार असलेले बरेच संशयित हाती लागले आहेत. पोलिसांनी त्यांचे फोटो काढून गुन्ह्यांच्या यादीसह स्वतंत्र प्रोफाइल अपडेट केल्या आहेत.
