भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचा उत्कृष्ट प्रांताधिकारी म्हणून गौरव
भुसावळ (18 ऑगस्ट 2024) : भुसावळचे येथील प्रांताधिकारी जितेद्र पाटील यांना जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उपविभागीय अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार देताना एकूण वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. शासकीय महसूल वसुली, भूसंपादन विविध अपील केसेस, हद्दपार आदेश प्रकरणे, जमीन विषयक प्रकरणे विविध दाखले वाटप या कामाची दखल घेत त्यांना हा बहुमान देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत गौरव
गुरुवार, 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उपविभागीय अधिकारी हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार देताना भुसावळ पालिका आणि वरणगाव पालिका प्रशासक म्हणून प्रभावी कामकाज तसेच विभागातील तिन्ही तालुक्यात शासनाच्या विविध योजना आणि विविध सेवा नागरिकांना विहित मुदतीत, अचूक रीतीने आणि कार्यक्षमपणे राबवण्यामध्ये भरीव योगदान दिले. तीन्ही तालुक्यातील तहसीलदार आणि तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त योगदानामुळे भुसावळ उपविभागाला हा पुरस्कार मिळाला. एकाच वर्षी उत्कृष्ट तहसीलदार आणि उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी हा पुरस्कार प्रथमच भुसावळ उपविभागाला मिळाला आहे.





