भुसावळातील महालक्ष्मी ग्रुपतर्फे साकेगाव रस्त्यावर वृक्षारोपण
भुसावळ (18 ऑगस्ट 2024) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरातील महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी ग्रुप व भुसावळ पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या सहकार्याने भुसावळ-साकेगाव रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे जेष्ठ सदस्य सुधीर गंगाधर पाटील, भिरूड ट्रेडर्सचे पंडितराव भिरुड, अरुण धांडे, दिनेश भंगाळे, प्रकाश पाटील, किशोर पाटील, बाबूराव भंगाळे, संजय बर्हाटे, चंद्रकांत पाटील, धर्मराज देवकर, मुरलीधर लोखंडे, लिलाधर भारंबे, राजू वाघोदे, वासुदेव कोलते, नितीन लोखंडे, मनोज महाजन, दिलीप बर्हाटे, ओम फुडचे संचालक दीपक झांबरे उपस्थित होते.

