रामगिरी महाराज, सरला बेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा
भुसावळसह यावल शहरात प्रशासनाला मुस्लीम बांधवांचे निवेदन
भुसावळ (19 ऑगस्ट 2024) : रामगिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुसावळसह यावल तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी पोलीस प्रशासनाला केली. महाराजांनी मुस्लीम धर्म व धर्मगुरु संदर्भात चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करीत दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करीत द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावल पोलीस ठाण्यात निवेदन
यावल पोलिसात किनगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन. नितेश राणे हे सुध्दा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणुनबुजून चिथावणीखोर भाषण करीत असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

भुसावळात बाजारपेठ पोलिसांना निवेदन
भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलीस उपअधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. श्रीरामगिरी गुरु नारायण गिरी महाराज तसेच सरला बेट यांनी आपल्या प्रवचनात हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने समाजामध्ये प्रचंड रोष पसरला आहे. निवेदनावर समाधानकारक कार्यवाही न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मौलाना रेहान रजा, मौलाना हकीम साहब मुफ्ती वसी अहमद, मौलाना सुफियान रजा, मौलाना सुल्तान रजा, मुस्लिम मंचचे संस्थापक अध्यक्ष साबीर शेख मेंबर, जुनैद खान, मेंबर मुनव्वर खान, सलीम गवळी, रहिम कुरैशी, रऊफ ठेकेदार, फिरोज कुरैशी, बशीर ठेकेदार, अहमद कुरेशी मेंबर, पापा मेंबर, मुश्ताक मेंबर, नजर भांजा, अकबर गवळी, साजीद बागवान, फिरोज भाई, इरशाद खान, सिकंदर खान मेंबर, सद्दाम खाटीक, निसार शेख, नईम शेख महेबूब खान, अब्दुल सईद भाई, फैजान शेख, जुबेर खान, शेख फवाद, मुदस्सीर बागवान, तनवीर अहमद, जावेद शेख, आरीफ शेख, जुबेर खान, शोएब तडवी आदींची उपस्थिती होती.




