रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : बडनेरा-अमरावती शटल सेवा महिनाभर रद्द


Badnera-Amravati shuttle service canceled for a month भुसावळ (19 ऑगस्ट 2024) : भुसावळ विभागातील बडनेरा स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक 03 आणि 04 च्या विस्तारीकरणांचे कार्य सुरू असल्याने बडनेरा ते अमरावती दरम्यान शटल सेवा दिनांक 17 ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

या फेर्‍या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 01375 बडनेरा ते अमरावती शटल, 01376 अमरावती ते बडनेरा शटल, 01377 बडनेरा ते अमरावती शटल, 01378 अमरावती ते बडनेरा शटल, 01379 बडनेरा ते अमरावती शटल, 01380 अमरावती ते बडनेरा शटल रद्द करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !