शिरसाळा-बोदवड रस्त्याची दुरवस्था : लोकप्रतिनिधी बेदखल


Poor condition of Shirsala-Bodwad road : People’s representatives evicted बोदवड (20 ऑगस्ट 2024) : शिरसाळा ते बोदवड रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. जागृत देवस्थान शिरसाळा मारोती येथे मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून भाविक येतात मात्र खराब रस्त्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खराब रस्त्यामुळे अपघाताची भीती
रस्त्यावर जीवघेणे खड्डे असल्याने वेळप्रसंगी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाने रस्त्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आठ दिवसाच्या आत कामाला सुरुवात न झाल्यास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोदवड तालुकातर्फे रास्ता रोको व उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिरसाळा ते देवधाबा हा सुद्धा नादुरुस्त असल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबतही दखल घेण्याची अपेक्षा आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !