महिलांच्या सन्मानासाठी विविध योजना राबवणार : डॉ.कुंदन फेगडे


फैजपूर (21 ऑगस्ट 2024) : समाजात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यांच्या सन्मानासाठी आणि विकासासाठी विविध योजना राबवण्यात येतील व महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढील पाऊल उलचण्याची ग्वाही आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी येथे दिली. रावेर मतदारसंघातील समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने राखीपौर्णिमा सणाचे औचित्य साधून, फैजपूर शहरात भव्य महिला स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी महिलांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला.

अडीच हजार महिलांचा सहभाग
विशेष कार्यक्रमात एकूण अडीच हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात स्वामी सोपान कानेरकर यांचे प्रेरणादायी प्रवचनात त्यांनी महिलांच्या सन्मानाचे आणि समाजातील त्यांच्या महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, हिरालाल चौधरी, रंजना पाटील, सविता भालेराव, हर्षल पाटील, प्रल्हाद महाजन, उमेश फेगडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, नरेंद्र नारखडे, सारिका चव्हाण, रेखा बोंडे, जयश्री चौधरी, वासुदेव नरवाडे, योगेश चौधरी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !