भुसावळातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे गीत गायन स्पर्धा
भुसावळ (21 ऑगस्ट 2024) : शहरातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे स्व.किशोर कुमार यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. 107 स्पर्धकांपकी 61 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
परीक्षण संगीततज्ज्ञ व ख्यातनाम गायक डॉ.आनंद चंद्रपूर, श्लोक चौधरी, संगीत नृत्य कला निकेतनचे संचालक सुनील पाटील व अनिता पाटील यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुर्बान शहा, द्वितीय क्रमांक धनश्री कुलकर्णी, तृतीय क्रमांक अतुल हिंगोणेकर, तर उत्तेजनार्थ क्रमांक संतोष मेश्राम व मानस पाटील यांनी पटकावला. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.सुवर्णा गाडेकर यांनी दीपप्रज्वालन केले. एससीएसटी रेल्वे युनियन अध्यक्ष सुधीरभाई जंजाळे, महापारेषण स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल डोंगरे, पत्रकार प्रेम परदेशी, डॉ.महेफुझ सैय्यद, विलास तायडे, वंशिका प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक नरवाडे, संभाजी सोनवणे, अखिलेश कुमार, आशिष व्यास, रोहित अडकमोल, आनंद सोनवणे, जितेंद्र उईके, संतोष मेश्राम, समाधान जाधव आदींची उपस्थिती होती. आशिष व्यास व संभाजी सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर आभार समाधान जाधव यांनी मानले.

