एक लाख 80 हजारांची लाच भोवली : जळगाव जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीकडून अटक
Senior Clerk of Jalgaon Zilla Parishad arrested by ACB जळगाव (22 ऑगस्ट 2024) : एक लाख 80 हजारांची लाच घेताना जळगाव जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. नरेंद्र किशोर खाचणे (52, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दोन लाखांची मागितली लाच
26 वर्षीय तक्रारदार सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर कार्यरत होते मात्र त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समितीत बदली करण्यात आली व बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (52) यांनी 21 ऑगस्ट रोजी दोन लाख रुपयांची लाच मागितली व एक लाख 80 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती एक लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सुर्यवंशी, कॉन्स्टेबल सचिन चाटे आदींनी ही कारवाई केली.
