पाचोरा-जामनेर रेल्वे विस्तारीकरणाचा भुसावळात मंत्री रक्षा खडसेंनी घेतला आढावा

डीआरएम कार्यालयात आढावा बैठक : सुविधांचा घेतला आढावा


Minister Raksha Khadse reviewed the Pachora-Jamner railway expansion in Bhusawal भुसावळ (22 ऑगस्ट 2024) : भुसवळ विभाग अंतर्गत येणार्‍या विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालयात केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. यावेळी पाचोरा-जामनेर रेल्वे विस्तारीकरणाचा आढावा घेण्यात आला तसेच तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खडसे यांनी भुसावळ कंट्रोल रूमला भेट दिली.

जिल्हाधिकार्‍यांशी साधला संवाद
आढावा बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्टेशन तसेच भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रगतीपथावर असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तसेच पाचोरा-जामनेर (पीजे रेल्वे) विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आढावाव घेण्यात आला. बोदवड तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या मंजूर असलेल्या जुन्या अलायमेंटनुसार काम करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यात आला व अडचणी सोडवून संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. भूसंपादनासाठी शासनामार्फत 100 कोटींचा निधी मंजूर आहे.


पॅसेंजर गाड्यांना थांब्याबाबत चर्चा
रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरणगाव, निंभोरा, सावदा व रावेर आदी प्रमुख स्टेशनवर स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीसाठी जास्तीत-जास्त पॅसेंजर गाड्यांना थांबा देण्याबाबत दखल घेण्यासह अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर नव्याने बनविण्यात आलेल्या रोड अंडर ब्रीजमुळे शेत-शिवार किंवा गावठाणमध्ये पाणी साचून शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असल्याने तत्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आले. आचेगावात आरयुबीमुळे गेट बंद झाल्याने रस्त्याची अडचण असल्याने जमीन अधिग्रहित करून रस्ता उपलब्ध करावा तसेच नांदुरा येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या तांत्रिक अडचणी सोडवून काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. डीआरएम ईती पांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !