बोदवडला विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
बोदवड (22 ऑगस्ट 2024) : बोदवड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्यांना सरकट कर्जमाफी मिळावी, पोखरा योजना सुरू करावी, जलजीवन मिशन योजनेचे काम त्वरित सुरू करावे, विविध योजनेत सुरू असलेल्या घरकुलांची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करावी, 15 एचपीपर्यंत वीज बिल सरसकट माफ करावे, कापसाला किमान बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात अॅड.रवींद्र पाटील, अॅड.रोहिणी खडसे, बोदवड तालुकाध्यक्ष सतीश पाटील, प्रदेश सचिव विजय चौधरी, नगरसेवक भरत अप्पा पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





