भुसावळात वर्ल्ड फोटोग्राफी डे उत्साहात
भुसावळ (22 ऑगस्ट 2024) : शहरातील छायाचित्रकारांतर्फे जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला. यावेळी ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या काळातील फोटोग्राफर नरर्सिंग राठोड यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.
नरसिंग राठोड, राजेंद्र जावळे, गोकुळ महाजन, श्याम गोविंदा, गणेश राठोड, छाया राठोड, कल्पना जावळे, ज्योती महाजन, आभा साळी, स्मिता राठोड आदी उपस्थित होते.प्रसंगी नरसिंग राठोड यांनी जुन्या काळातील फोटोग्राफीच्या आठवणी सांगत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेंद्र जावळे तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिद्धेश राठोड यांनी सहकार्य केले.

