प्रयागराजचे एटीएम दरोडेखोर नागपूर पोलिसांच्या जाळ्यात
विविध बँकांची 117 एटीएम कार्ड जप्त
Prayagraj ATM robber in Nagpur police net नागपूर (22 ऑगस्ट 2024) : नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून एटीएम दरोडेखोरांना बेड्याठ ोकल्या आहेत. एटीएममध्ये पैसे काढून देण्याच्या बहाण्याने आरोपी कार्डाची अदलाबदल करून नंतर या कार्डाद्वारे पैसे काढत होते. त्यांनी आतापर्यंत 50 ते 60 लाखांचा घोटाळा केल्याचा अंदाज आहे.
ज्येष्ठाला घातला होता गंडा
अंबाझरी पोलिस ठाण्यातंर्गत येणार्या रविनगर येथील एसबीआय एटीएममध्ये 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली होती. 72 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा एटीएम पीन माहिती करून घेतला व पैसे काढताना एटीएम बदलले. ज्येष्ठ नागरिक घरी गेल्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या मोबाईलवर 90 हजार रूपये व्यवहार झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लागलीच अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

117 एटीएम जप्त
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा प्रयागराजपर्यंत माग काढला. तीन आरोपींसह दोन चार चाकी गाड्या, चार मोबाईल तसेच वेगवेगळ्या बँकांचे 117 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले.
