राष्ट्रवादी शरद पवार गट रावेर विधानसभा मतदारसंघाची मागणी करणार !

जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची रावेरात माध्यमांना माहिती


रावेर (23 ऑगस्ट 2024) : रावेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आमच्याकडे ही जागा लढवण्यासाठी तुल्यबळ इच्छुक उमेदवार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी येथे केले. रावेर शहरातील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कल लक्षात घेवून मागणी करणार
राज्यात विधानसभा महाविकास आघाडी एकत्रत लढणार आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे. माजी आमदार अरुण पाटील रावेर मतदारसंघातून इच्छुक आहे. कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेऊन पक्षाकडे रावेर मतदारसंघाची मागणी करणार आहेत, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार अरुण पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचे किशोर पाटील, सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील ,नितीन पाटील, प्रकाश पाटील आदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !