रेल्वेचा मेगा ब्लॉक : दहा गाड्या रद्द पाच रेल्वे गाड्यांचे बदलले मार्ग


अप-डाऊन लाईनीवरील कल्याण-टिटवाळा मार्गावर मेगाब्लॉकने 13 रोजी प्रवाशांची होणार गैरसोय : दोन गाड्या उशिराने धावणार

भुसावळ : मध्य रेल्वेच्या अप-डाऊन रेल्वे मार्गावर मुंबई विभागाकडून विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक शुक्रवार, 13 रोजी घेण्यात येत आहे. टिटवाळा येथे पुलाच्या गर्डरचे काम होणार असून 13 रोजी मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या ब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तसेच दोन गाड्या या उशिराने धावणार असून नऊ गाड्यांना विविध स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

मेगा ब्लॉकने दहा रेल्वे गाड्या रद्द
डाऊन 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस 14 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. अप 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस 13 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. अप 12117 मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस 14 मार्च रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12118 लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्सप्रेस 14 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे.
अप 12112 अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 13 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12111 मुंबई-अमरावती एक्स्प्रेस 14 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. अप 11402 नागपूर-मुंबई एक्स्प्रेस 13 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे. डाऊन 11401 मुंबई-नागपूर एक्स्प्रेस 14 मार्चला प्रस्थान स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. अप 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 13 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली तर डाऊन 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर 14 रोजी प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली आहे.




पाच गाड्यांचे बदलले मार्ग
अप 11062 मुजफ्फरपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस 12 रोजी जळगाव-वसई रोडमार्गे धावणार आहे तर अप 11058 अमृतसर-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस 12 रोजी मनमाड-दौंडमार्गे धावणार आहे. अप 12541 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस 12 रोजी जळगाव-वसई रोड मार्गे धावणार आहे तर अप 11016 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस 12 रोजी मनमाड-दौंड या मार्गे धावेल तर अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 14 रोजी मनमाड-दौंड या मार्गे धावणार आहे.

दोन गाड्या विलंबाने धावणार
अप 12541 लोकमान्य टिळक टर्मिनल-गोरखपूर एक्स्प्रेस 14 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून 11.10 ऐवजी 12.05 वाजता सुटणार आहे तर अप 11016 लोकमान्य टिळक टर्मिनल- गोरखपूर एक्स्प्रेस 14 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरुण 12.15 ऐवजी 3.50 वाजता सुटणार आहे.

नऊ गाड्यांना विविध स्थानकांवर थांबा
अप 18030 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस ही 14 लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी कसारा स्टेशनवर थांबवली जाणार आहे तर अप 12810 हावडा-मुंबई मेल 14 रोजी मुंबई ऐवजी ईगतपुरी स्टेशनवर थांबवण्यात येणार आहे. अप 12102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनल ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्स्प्रेस रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी ईगतपुरी स्टेशनवर थांबवण्यात येणार आहे. अप 12545 रक्सोल-लोकमान्य टिळक टर्मिनल कर्मभूमी एक्स्प्रेस 14 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशनवर थांबवली जाणार आहे. अप 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस 14 रोजी मुंबईऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवली जाईल. अप 17058 सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस 14 रोजी मुंबईऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशनवर थांबवन्यात येणार आहे. अप 12138 फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल 14 ला मुंबईऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवली जाईल. अप 12154 हबीबगंज-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस 14 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवली जाई तसेच अप 12290 नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस 14 मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशनवर थांबवली जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !