बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भुसावळात महाविकास आघाडीचे आंदोलन
पदाधिकार्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत महायुती सरकारचा केला निषेध
Movement of Mahavikas Aghadi in Bhusawal to protest the Badlapur incident भुसावळ (25 ऑगस्ट 2024) : बदलापूर घटनेतील दोषी नराधमावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महायुती सरकारचा निषेध केला. शनिवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी काँगे्रस अल्पसंख्यांक विभागाचे मुनव्वर खान, शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, भगवान मेढे, जिल्हा घरेलू कामगार अध्यक्ष राजेश डोंगरदिवे, शहर सरचिटणीस संतोष साळवे, सलीम गवळी, हमीद शेख, आदिवासी अध्यक्ष अन्वर तडवी, संजय खडसे, शैलेश नन्नवरे, डॉ.संदानशिव, सागर वानखेडे, युवक नेते ईमान खान, राम अवतार परदेशी, हमीदा गवळी, फातिमा बी.आदी सहभागी झाले.

रावेरला महाविकास आघाडीतर्फे निदर्शने
रावेर : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रावेरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे शनिवारी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रावेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्याचा सन्मान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ याकडे सरकारचे लक्ष वेधले पाहिजे म्हणून निषेध म्हणून तोंडावर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, सोपान पाटील, हरिष गणवाणी, उबाठा शिवसेनेचे प्रल्हाद महाजन, योगीराज पाटील, रवींद्र पवार ,अविनाश पाटील, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रमेश महाजन, योगेश पाटील, सुनील कोंडे, अॅड.योगेश गजरे, राजु सवर्णे, अय्युब खा पठाण, अशोक शिंदे, महेमूद शेख, संतोष पाटील, सावन मेढे, भुपेंद्र जाधव, धुमा तायडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
