चाळीसगाव तालुका हादरला : पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या


Chalisgaon taluka shaken: Husband commits suicide after killing his wife चाळीसगाव (28 ऑगस्ट 2024) : पत्नीचा खून करीत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवार, 26 रोजी घडली. लक्ष्मीबाई पावरा (26) व गोपाल पावरा उर्फ बारेला (30) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.

चारीत्र्याच्या संशयतातून घटना
चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री बु.॥ प्र.दे. येथे शिवाजी शामराव पाटील यांचे तळोंदे प्र.दे.शिवारात शेत आहे. या शेतातील पत्र्याच्या खोलीत मध्य प्रदेशातील (रा.तारापूर, ता.जि.गुना) येथील गोपाल सत्त्तरसिंग पावरा (बारेला) (30) व त्याची पत्नी लक्ष्मीबाई हे आदिवासी दाम्पत्य आठ दहा दिवसांपूर्वी शेत कामानिमित्त आले होते. सोमवार, 26 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोपाल पावरा हा घरात गळफास घेतलेल्या तर लक्ष्मीबाई ही लोखंडी पलंगावर मृतावस्थेत आढळले, त्याच्या नातेवाइकांनी ही माहिती शेत मालकाला दिली.

पत्नीचा दोरीने आवळला गळा
लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाला. मेहुणबारेचे सहा. पोलिस निरीक्षक प्रवीण दतरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मृत गोपाल पावराविरुद्ध उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

चारित्र्याच्या संशयातून घटनेचा संशय
याप्रकरणी मृतांच्या नातेवाइकांचे जाब जबाब घेतले असता, त्यात मयत गोपाल बारेला हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारियावर संशय घेवून तिला शिवीगाळ, मारहान करून तिला मारण्याची धमकी देत असे. त्यावरून गोपाल यानेच त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारीत्र्याच्या संशयावरून अथवा किरकोळ कारणावरून वाद होऊन तिच्या तोंडात कापडाचा बोळा देऊन तिचा दोरीने गळा आवळून खून केला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असे सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !