गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतूसासह वरणगावचा संशयीत जाळ्यात


Varangaon suspect nabbed with Gavathi pistol and eight live cartridges वरणगाव : जळगाव गुन्हे शाखेने वरणगावातील तरुणाला गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतूसासह पकडल्याने शहरात खळबळ उडाली. राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (39, रामपेठ वरणगाव, ह.मु.शिवराय चौक, फुलगाव, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला संशयीत मनोज शिंदेकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली होती व त्यानुसार पथकाने संशयीताला 27 ऑगस्ट रोजी वरणगावच्या तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्सजवळून अटक केली. संशयीताच्या अंग झडतीत 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व आठ हजार रुपये किंमतीची आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रीतम पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !