भुसावळात राष्ट्रवादीने काँग्रेसने फोडली महायुती सरकार काळातील भ्रष्टाचाराची दहिहंडी

भुसावळात फसव्या योजनांचे माहितीपत्रक, काळे फुगे बांधून निदर्शने


Scattered brochures of fraudulent schemes, tied up black balloons and held demonstrations भुसावळ (29 ऑगस्ट 2024)  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवार, 27 रोजी शहरातील यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर महायुती सरकारच्या विरोधात सरकारने केलेल्या फसव्या योजनांच्या विरोधात निदर्शन आंदोलन केले. यावेळी काळे फुगे बांधून महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील दहिहंडी बांधण्यात आली. महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचे माहितीपत्रक वितरण करण्यात आले.

सरकारवर पदाधिकार्‍यांनी केली टिका
रावेर लोकसभेचे कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी महायुतीवर सरकारवर टिकास्त्र सोडले तर जिल्हा प्रवक्ते योगेश पाटील यांनी सरकारने आतापर्यंत केलेल्या फसव्या योजनांची माहिती देत लाडकी बहिण योजनेचा पैसा दिला पण राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले नसल्याचे सांगितले. या सरकारच्या फसव्या धोरणांना बळी पडू नये, असे वरणगाव शहराचे शहराध्यक्ष समाधान चौधरी सांगितले. यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, युवक कार्याध्यक्ष विशाल ठोके आदींसह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


माहिती पत्रकांचे केले वितरण
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आंदोलमध्ये कर्जमाफीचा फज्जा, फसवी पीक योजना, सन 2023-24 मधील पंतप्रधान कृषी सिंचन योजना आदींसह विविध योजनांची पोलखोल करणार्‍या माहिती पत्रकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत असलेले 188 कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान लवकरात लवकर मिळावे आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या.

सरकारच्या कारभारावर टिकास्त्र
विधानसभा निवडणुका समोर असल्यामुळे लाडक्या शेतकर्‍यांसाठी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी नसलेल्या घोषणांचे फटाके फोडले जात आहे. बळीराजा आत्महत्या, आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष, आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी, महापुरुषांचा अवमान, वारी विरोधी सरकार, बेरोजगारीचे संकट, वाढता महिला अत्याचार वाढल्याची टिकाही यावेळी पदाधिकार्‍यांनी केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !