पलवल रेल्वे स्थानकावर ब्लॉक : पठाणकोट, गौंडवाना एक्स्प्रेस रद्द : सहा गाड्यांच्या मार्गात बदल


भुसावळ (29 ऑगस्ट 2024) : उत्तर रेल्वेमधील पलवल स्टेशन येथे पलवल ते न्यू प्रिथला यार्ड येथे कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरून धावणार्‍या मुंबई अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस व भुसावळ हजरत निजामुद्दिन गोंडवाना एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या तर अन्य सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

चार रेल्वे गाड्या रद्द
उत्तर रेल्वेमधील पलवल स्टेशन येथे नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कामामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या प्रवासी गाड्यामध्ये बदल केला आहे. तर चार गाड्या रद्द करण्यात आल्या तर रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस ही गाडी 3 ते 15 सप्टेबरपर्यंत रद्द राहील. गाडी क्रमांक 11058 अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस ही गाडी 6 ते 18 सप्टेबरपर्यंत रद्द राहील तसेच गाडी क्रमांक 12405 भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 8 ते 17 सप्टेंबर या काळात रद्द राहील. तर गाडी क्रमांक 12406 हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 6 ते 15 सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.

या गाड्यांचे मार्ग परिवर्तन
पलवल येथील ब्लॉकचा फटका लांब पल्याच्या सहा गाड्यांनाही बसला आहे. या गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे. यात मुंबई-फिरोजपूर एक्सप्रेस ही गाडी 5 ते 16 सप्टेंबरपर्यंत मथुरा, अलवर, रेवारी, अस्थल बोहार मार्गे वळवली जाईल. 12138 फिरोजपूर-मुंबई एक्सप्रेस ही गाडी सुध्दा याच काळात याच मार्गाने धावणार आहे. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 15 सप्टेंबरला आग्रा, मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्गाने वळवली जाईल तसेच हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेस ही गाडी 6 ते 17 सप्टेंबर या काळात गाझियाबाद, मितावादी, आग्रा मार्गे वळवली जाईल. वास्को दि गामा-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी 4 ते 15 सप्टेंबरपर्यंत आग्रा, मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्गे वळवली जाईल. हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा एक्स्प्रेस ही गाडी 6 ते 17 या काळात हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मितावादी, आग्रा मार्गे वळवली जाईल. प्रवाशांनी नोद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !