स्वस्तात दुचाकी विक्री करणारा वरणगावचा चोरटा जाळ्यात : चोरीच्या चार दुचाकी जप्त
जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : साथीदारांचा कसून शोध
Varangaon thief who sold two-wheelers for cheap in the net: four stolen two-wheelers seized भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : वरणगाव येथील संशयीत अल्प किंमतीत दुचाकी विक्री करीत असल्याची जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने तीन दिवस पाळत ठेवली व खातरजमा केल्यानंतर वरणगावच्या तिरंगा चौकातून जाबीर शहा भिकन शहा यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताची चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या चार दुचाकी काढून दिल्या.
चोरीच्या चार दुचाकी जप्त
आरोपी भिकन शहा याच्या ताब्यातून मुक्ताईनगर हद्दीतील एचएफ डिलक्स दुचाकी, मलकापूर हद्दीतील अॅक्टीव्हा, एमपीच्या बर्हाणपूर जिल्ह्यातील खकनार हद्दीतील रॉयल इनफिल्ड बुलेट, होंडा कंपनीची युनिकॉर्न अशा एकूण सुमारे दिड लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीला अधिक कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, भारत पाटील, दीपक चौधरी आदींच्या पथकाने केली.
