भुसावळ रनर्सच्या ‘एकता’ची विजयी पताका : 22 किमी मॅरेथॉनमध्ये विजय


भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : रनबडीज संस्थेतर्फे त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर तीन किमी, पाच किमी, 10 किमी, 15 किमी व 22 किलोमीटर या श्रेणींमध्ये मॅरेथॉन स्पर्धा झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे 20 धावपटू सहभागी झाले. एकता भगत महिलांच्या गटात 22 किमी अंतरात तृतीय ठरल्या.

भुसावळची धावपटू अव्वल
एकता भगत यांचे नाव विजयी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर पोहोचताच आयोजकांना भुसावळचा रनिंग ग्रुप आल्याची माहिती दिली व यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रवीण पाटील यांनादेखील व्यासपीठावर बोलावण्यात आले व एकदा भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व धावपटूंनी एकच जल्लोष केला. स्पर्धेमध्ये मुंबई, पुण्यासह इतर राज्यातील देखील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी धावपटूंपैकी पुष्पा व संजय तिवारी तसेच जयश्री व जितेंद्र चौधरी या दाम्पत्यांनी देखील एकत्र सहभाग नोंदविला.

या धावपटूंनी नोंदवला सहभाग
या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटूंमध्ये 22 किमी- एकता भगत, जयश्री चौधरी, जितेंद्र चौधरी, माया पवार, डॉ.रोहित पाटील, श्री हरिराम, निलेश पाटील, 15 किलोमीटर- डॉ.चारुलता पाटील, स्वाती फालक, डॉ.उमाकांत चौधरी, राकेश चौधरी, 10 किलोमीटर- पुष्पा तिवारी, ज्योती सिंग, किर्ती मोताळकर, प्रवीण पाटील, पाच किलोमीटर- पुष्पलता चौधरी. दरम्यान, डॉ.निलिमा नेहेते, प्रमोद शुक्ला, सारंग चौधरी, सुनीता रंजन सिंग व सुषमा सिंग हे धावपटू वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !