जळगावात फी मागितल्याच्या रागातून डॉक्टरांना फायटरसह लोखंडी पाईपने मारहाण


जळगाव (30 ऑगस्ट 2024) : दवाखान्याची फी मागितल्याचा राग आल्याने मद्यप्राशन केलेल्या चौघांसह अन्य चार जणांनी डॉक्टरला शिवीगाळ केली. त्यानंतर फायटर, लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या घटनेत डॉक्टर गंभीर जखमी झाले. मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता ही घटना अयोध्यानगरात दवाखान्यात घडली. याप्रकरणी बुधवार, 28 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ संशयीतांविरोधात गुन्हा
डॉ.योगेश बसेर (45, रा.भिकमचंदनगर) यांचा अयोध्यानगरात दवाखाना आहे. बाब्या यादव, गोलु जोनवार, सुबोध कोळी, हर्षल तसेच त्यांचे चार साथीदार या दवाखान्यात मद्यप्राशन करुन उपचारकामी आले. डॉक्टरांनी दवाखान्याची फी त्यांच्याकडे मागितली. याचा राग येऊन या संशयितांनी डॉक्टराला शिवीगाळ करत मारहाण केली. खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत डॉक्टरांचे नाक फॅक्चर झाले. डोक्याला, डाव्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी आठही संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलीस निीरक्षक दत्तात्रय निकम यांनी जावून माहिती घेतली. तपास एपीआय अनिल वाघ हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !