भुसावळातील भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
भुसावळ (30 ऑग्स्ट 2024) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन देशाभरात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची 113 वी जयंती आहे. भारत सरकारतर्फे खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार दिले जातात, असे प्रस्तावनेत प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस खेळांच्या परिवर्तनीय शक्तीची आठवण करून देतो. यावेळी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रकाश सावळे व खेळाडू उपस्थित होते.

