जळगावात कारच्या धडकेने वयोवृद्ध ठार
Elderly man killed in car collision in Jalgaon जळगाव (1 सप्टेंबर 2024) : महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका कायम असलेल्या जळगावात भरधाव कारने धडक दिल्याने 78 वर्षीय वृद्धाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडला. अपघाताबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. अजबसिंग नारायण पाटील (78, रा.द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
रस्ता ओलांडताना गाठले मृत्यूने
अजबसिंग पाटील हे द्वारकानगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. अजबसिंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणार्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणार्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा. धडक देणारी कार ही धडक दिल्यानंतर एरंडोलच्या दिशेने निघून गेली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
