भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात वृक्षारोपण
भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. डॉ.प्राचार्य रमेश जोशी यांच्याहस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयीन परिसरात विविध प्रकारची सुशोभित झाडे लावण्यात आली.
बीए व बीकॉमच्या सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. डॉ.पूनम त्रिवेदी, डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.प्रवीण जाधव, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे व बद्रीप्रसाद केवट आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला.


