भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.एन.के.नारखेडे यांना अभिवादन


भुसावळ (1 सप्टेंबर 2024) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना रविवार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अभिवादन करण्यात आले.

मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करीत अभिवादन केले. यावेळी उपमुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी उपशिक्षक एन.जे.खाचणे यांनी स्व.दादासाहेब एन.के.नारखेडे यांच्या व्यक्तिमत्वा संदर्भात आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची माहिती दिली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !