भुसावळ शहरात 40 पथकांच्या माध्यमातून डेंग्यूचे सर्व्हेक्षण
भुसावळ (2 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरात पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 40 पथकांच्या माध्यमातून डेंग्यूचे सर्व्हेक्षण सुरू आहे. सुदैवाने डेंग्यू अथवा डेंग्यू सदृष्य आढळलेला नाही.
40 पथकांच्या माध्यमातून डेंग्यूचे सर्व्हेक्षण
शहरात पालिकेच्या माध्यमातून शहरात डेंग्यूचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील 40 पथकांच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण केले जात आहे. सर्व्हेक्षणात पथकातील कर्मचारी हे घरात, टायरमध्ये, भाड्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे डेंग्यूचे डास तयार होत असल्याने त्यांची पाहणी करून उपाययोजना करीत आहे. गेल्या महिन्यात शहरात 16 डेंग्यू संशयीत रुग्ण आढळले होते तेव्हापासून सर्व्हेक्षणाला गती आली आहे. बदललेले वातावरण, पडत असलेला पाऊस यामुळे रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता डेंग्यूचे सर्व्हेक्षण केले जात आहे. शहरात गेल्या महिन्यात डेंग्यू संशयीत 16 रुग्ण आढळले होते. या रुग्णांचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. ते डेंग्यूचे रुग्ण नसल्याचे समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.तौसीफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेक्षण केले जात आहे.

