श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात आज यात्रोत्सव : राज्यासह शेजारील राज्यातून भाविक येणार !


Pilgrimage to Shri Kshetra Manudevi Temple Today : Devotees will come from neighboring states along with the state यावल (3 सप्टेंबर 2024) : सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचा यात्रोत्सव मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी हा यात्रोत्सव साजरा होतो. सध्या दमदार पाऊस झाल्याने येथे निर्सगरम्य वातावरणात दर्शन घेण्याकरीता राज्यभरातून तसेच शेजारील राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक वर्ग येण्याची शक्यता आहे. मंदिर व्यवस्थापनाकडुन भाविकांना योग्य दर्शन घेता यावे म्हणून तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनाककडून मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

राज्यभरातून येणार भाविक
आडगाव-कसारखेडा जवळील सातपुड्याच्या कुशीत खान्देशाचे कुल दैवत आई मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निर्सगरम्य वातारणात येथे मंगळवारी येथे यात्रा आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी येथे यात्रा असते. या ठिकाणी यात्रा निमित्त दर्शनासाठी राज्यभरातून तसेच शेजारील राज्य मध्यप्रदेश व गुजरातमधून भाविक येतात. दर्शनार्थ येणार्‍या भाविकांसाठी स्त्री, पुरूष अशा रांगा लावुन दर्शनासाठी सोय मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. नवस फेडणार्‍या भाविकांकरीता येथे सभा मंडपात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिली. यात्रेत यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याकडून पोलिस अधिकारी, कर्मचारी सह गृह सुरक्षा दलाच्या माध्यमातुन बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

धबधब्याचे आकर्षण
यंदा सातपुड्याच्या पर्वतरांगेत दमदार पावस झाल्याने येथील धबधबा ओसंडून वाहत आहे. पायथ्याशी असलेल्या धरणातदेखील मोठ्या प्रमाणात जलसाठा साचला आहे व सर्वत्र पसरलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षीत करणारी आहे.
सातपुड्याच्या वनराईत वसलेल्या या श्री क्षेत्रावर दर्शन घेतल्या नंतर सहलीचा देखील आनंद लुटण्या करीता येथे ‘वनडे ’ ट्रीप साठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !