अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यशाळेत भुसावळातील 243 विद्यार्थ्यांनी साकारली गणेश मूर्ती


भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा रविवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात झाली. या कार्यशाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या 243 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूमातीचे गणपती बनवले. प्रत्येक विद्यार्थ्याला अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे भिजवलेले मातीचे गोळे मोफत देण्यात आले. उद्घाटन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी आणि उद्योजक श्याम दरगड यांच्याहस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले.

पर्यावरण रक्षण हाच उद्देश
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा वापर होतो. ज्यामुळे जलाशयांचे प्रदूषण वाढते. याच पार्श्वभूमीवर शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचा प्रसार करणे, आणि पर्यावरण रक्षणासाठी अधिक लोकांना प्रेरित करणे हाच कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. कलाशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवण्याच्या कला आणि तंत्राची माहिती दिली.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, समन्वयक उमेश फिरके, सह-समन्वयक विपीन वारके आणि उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राहुल भारंबे, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, प्रा.श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, ललित महाजन, सचिन पाटील, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !