वढवे येथील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश


मुक्ताईनगर (3 सप्टेंबर 2024)  : मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथिल तरुणांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

पदाधिकारी तुमच्यासोबत
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. कोणत्याही सुख दुःखात पक्षाचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत. गावाच्या विकासासाठी निश्चित पाठपुरावा करू व विकासकामे मार्गी लावू, असेही त्या म्हणाल्या.

यांनी केला पक्षात प्रवेश
यावेळी विशाल सुरवाडे, प्रवीण धुंदले, रतन बोदडे, सुभाष सुरवाडे, समाधान सावळे, आनंदा धुंदले, विकास मोरे, रमेश सावळे, राहुल सावळे, दीपक सुरवाडे, निलेश बोदडे, राजेश सावळे, सागर तायडे, गौरव तायडे, अजय बोदडे, गौतम सावळे, प्रमोद बोदडे, पंडित सावळे, श्रीकृष्ण धुंदे, भारत तायडे, युवराज तायडे, रोहित तायडे, दिनेश बोदडे, रामदास धुंदे, अविनाश धुंदे, हर्षल सावळे आदींनी प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र (सोनू)पाटील, बापू ससाणे, निलेश भालेराव, निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, सुनील पाटील, संजय कोळी, रऊफ खान, रफिक मिस्त्री, राहु पाटील, चेतन राजपूत, बाळा चिंचोले, विजय शिरोळे, निवृत्ती कोळी, मुश्ताक मण्यार, फिरोज सय्यद, दर्शन ठाकूर, जितेंद्र पाटील, अजय अढायके आणि पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !