जळगावात 30 लाखांच्या लालसेपोटी वयोवृद्धेचा खून : दोन आरोपींना अटक


जळगाव (3 सप्टेंबर 2024)  : 30 लाखांच्या लालसेपोटी शहरातील खोटे नगर भागातील धनश्री नगरात राहणार्‍या 60 वर्षीय वृद्धेचा दोघांनी खून केला व मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहलता संजय चुंबळे (60, रा.धनश्री नगर खोटे नगर, जळगाव) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
स्नेहलता चुंबळे ही वृद्धा जळगावात वास्तव्याला होती. त्यांच्याकडे 30 लाख रुपये असल्याची माहिती संशयीत जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगनाथ निकम (दोन्ही रा.अमळनेर) यांना मिळाली. त्यानुसार दोघांनी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास 30 लाख रुपये मिळण्याच्या आशेने वृध्देचा घातपात करीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोप आहे. याबाबत समीर संजय देशमुख (28 रा.धनश्री नगर खोटे नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास जळगाव तालुका पोलीस निरीक्षक महेश शर्मा करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !