भुसावळच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दयाघन राणे यांचा मुंबईत सत्कार
भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतीकशास्त्र विभाग प्रमुख तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांचा नुकताच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स परिसरात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सन्मान करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र मासिक ‘कल्याण यात्रा-व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती विषयाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई होते. ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, ड्रग आणि नारकोटीक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे, अजयकुमार सर्वगौड, अविनाश पाटील, अनिल गलगली, वर्षा विद्या विलास आदींची उपस्थिती होती.

