प्रवाशांनो लक्ष द्या : बडनेरा मेमूसह वर्धा एक्स्प्रेस 5 व 6 सप्टेंबर रोजी रद्द
Wardha Express including Badnera Memu canceled on 5th and 6th September भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : बोदवड शहरातील रेल्वेचा जुना पादचारी पूल काढण्यासाठी विशेष ब्लॉक 5 व 6 सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे. या दिवशी गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक मेमू व 01212 नाशिक-बडनेरा मेमू तसेच गाडी क्रमांक 11121 भुसावळ-वर्धा एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक 11122 वर्धा-भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. बोदवड स्टेशनवरील जुना पादचारी पूल रेल्वे क्रेनद्वारे काढण्यात येणार आहे.
प्रवाशांनी पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

