पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून : 13 आरोपींना अटक


Murder of former corporator Vanraj Andekar in Pune : 13 accused arrested पुणे (4 सप्टेंबर 2024) : कौटूंबिक वादातून पुण्यातील राष्टवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा अलीकडेच खून झाला होता. पोलिसांनी ताम्हिणी घाटातून 13 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती.

टोळी वर्चस्वासह कौटूंबिक वादाची खुनाला किनार
वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे मात्र यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे. त्याची स्वत:ची टोळी असून, तो मोक्कातून जामिनावर बाहेर पडला आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते.

संधी मिळताच झाडल्या गोळ्या
पुण्यातील नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजता वनराज आंदेकर आल्यानंतर दबा धरून असलेल्या हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या तर अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्‍यांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तब्बल 13 जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !