आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश : राज्यातील लाडशाखीय वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापण्यास शासन मान्यता


मुंबई (11 ऑक्टोबर 2024) : राज्यातील लाडशाखीय वाणी या जाती समुदायातील नागरिकांचे चाळीसगाव मतदारसंघात नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात शासनाकडे त्यांनी विविध मागण्यांचे केल्या. प्रामुख्याने सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या बहुजन कल्याण विभागास दिले व गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्री मंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली.

आमदारांच्या पाठपुराव्याला यश
राज्यात लाडशाखीय वाणी समाजाची संख्या बहुसंख्य आहे. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्राम विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे वाणी समाजातर्फे आभार मानण्यात आले आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !