भुसावळातील दुर्गोत्सव मंडळांना अनुपकुमार मनुरेंनी दिली सदिच्छा भेट
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार : भुसावळ तालुक्यात वाढवला संपर्क
भुसावळ (13 ऑक्टोबर 2024) : आगामी काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागणार असून इच्छुकांनी आपापला संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. भुसावळात उच्चशिक्षीत गर्व्ह कॉन्ट्रक्टर अनुपकुमार मनुरे यांनी नवरात्रोत्सवात शहरातील विविध मंडळांना भेटी देत आपला संपर्क वाढवला. अनेक मंडळांमध्ये त्यांच्याहस्ते आरतीही करण्यात आली.
मनुरे यांची भुसावळ शहराशी नाळ
भुसावळातील अनुपकुमार मनुरे हे व्यवसायाने बिल्डर असून सोबतच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरही आहेत तर त्यांचे वडिल भुसावळ पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता व नंतर सहा.अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.


शहरातील मंडळांना दिल्या भेटी
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात मनुरे यांनी विविध मंडळांना भेटी दिल्या होत्या शिवाय दुर्गोत्सवातही त्यांनी मंडळांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्याहस्ते आरतीही करण्यात आली. प्रसंगी कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
निवडणुकीच्या दृष्टीने मनुरे यांनी नुकतीच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत.
महाविकास आघाडीकडून मागितली होती
भुसावळातील निवडणूक आखाड्यात अनेक उमेदवार इच्छूक असून त्यात महाविकास आघाडीकडून अनुपकुमार मनुरेदेखील इच्छूक आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे तर अन्य उमेदवारांनीही आपापली बलस्थाने सांगत उमेदवारी मागितली आहे. पक्षश्रेष्ठी आता नेमकी कुणाला उमेदवारी देतात ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




