कुर्हा परिसरात ढगफुटीसदृश पाऊस : शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली ; शेतकर्यांवर जलसंकट
Torrential rain in Kurha area: hundreds of hectares of agriculture under water ; Water crisis on farmers कुर्हाकाकोडा (14 ऑक्टोबर 2024) : कुर्हासह परिसरात परतीच्या जोरदार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शुक्रवार, 11 रोजी रात्री 10 वाजता कुर्हा परिसरात जोरदार वादळी वार्यासह रात्रभर पावसाने हजेरी दिल्याने शेतीत पाणी साचून शेती पिकांचे नुकसान झाले. कुर्हा गावासह परिसरातील आजूबाजूंच्या गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकर्यांकडील कापूस, सोयाबीन, तूर ,मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.
तत्काळ मदतीची अपेक्षा
ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गोरखगंगा नदीला पूर आला व याचदिवशी मुख्य बाजारपेठेत दसर्याची वर्दळ पाहता पुलावरील भाजीपाला, फुले यांची दुकाने बाजूला करण्यात आली तसेच गर्दीमुळे व्यापार्यांची व ग्राहकांची एकच गर्दी झाली. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

