महाराष्ट्रातील गोशाळा स्वावलंबी बनण्यावर भर : उद्धव नेरकर
बोदवड (15 ऑक्टोबर 2024) : गो शाळांच्या विकासाचे विविध तांत्रिक मुद्दे व गो विज्ञानाच्या वापराने नोंदणीकृत असणार्या भारतीय 53 गोवंशीय प्रजातीतून समृद्ध करण्या बरोबरच गोशाळांना स्वावलंबनाकडे वाटचालीस चालना देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून भर देण्यात येईल, असे मत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर यांनी बोदवड येथे व्यक्त केले. महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासनद्वारा अनुदानप्राप्त स्थानीय श्री गोरक्षण संस्थेच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत 25 लक्ष निधीतील निवारा शेडच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
शुद्ध गोवंशाची ओळख त्यांच्या अंगीकृत गुणांमुळे
नेरकर पुढे म्हणाले की, भारतातील शुद्ध गोवंशाची ओळख त्यांच्या अंगीकृत गुणांमुळे आहे. जगभरात भारतीय गोवंश सर्वश्रेष्ठ आहे. उत्कृष्ट रोगप्रतिकारक क्षमता, परजीवी प्रतिरोध, प्रतिकूल वातावरणात तग धरण्याची क्षमता, निकृष्ट चार्यावर उदर निर्वाह, मैत्रीपूर्ण मानवी वागणूक, सकस निर्भेळ दुध निर्मिती यासह देशी गोवंश च्या शेण गोमुत्राचा शेतीतील महत्पूर्ण उपयोग हे जमेची मुद्दे आहेत.

यांची मंचावर प्रमुख ऊपस्थिती
नगराध्यक्ष आनंदा पाटी, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मधुकर राणे, पशुधन विकास अधिकारी डॉ.दीपक साखरे, माजी सरपंच कैलास चौधरी, , उद्योजक अजय बर्डिया, रमेशशेठ अग्रवाल, नगरसेवक भरत आप्पा पाटील, व्यापारी संघटनेचे गोपाळशेठ अग्रवाल, बोदवड एज्युकेशन सोसायटी सचिव
विकास कोटेचा, डॉ.आसाराम काजळे, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नाना पाटील तर आभार अनंत कुळकर्णी यांनी मांडले. श्री गोरक्षण संस्था अध्यक्ष सागरशेठ कांकरिया, माजी अध्यक्ष कैलास खंडेलवाल, संघचालक हरिओमजी जैस्वाल, अभयकुमार बरडीया, नितीन शर्मा, संजय माटे, शांतीलाल झाबड, राजू बरडिया, अनिरुद्ध पाटील, गोलू बरडिया. डॉ.ब्रिजलाल जैन, राजेश अग्रवाल उपस्थित होते.




