भुसावळातील श्रीमती पदमबाई कपूरचंदजी कोटेचा महिला महाविद्यालयात संविधान दिन


Constitution Day at Smt. Padambai Kapurchandji Kotecha Women’s College, Bhusawal भुसवळ (27 नोव्हेंबर 2024) : भुसावळ शहरातील श्रीमती पदमबाई कपूरचंदजी कोटेचा महिला महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल होते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. धनश्री भालेराव, अर्पिता तायडे, प्रतीक्षा झवले यांनी संविधान गीत सादर केले.

विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत
प्रतीक्षा जोहरे, अर्पिता कापडे, छाया नेवेसकर, धनश्री कोळी, जयश्री सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. कविता बारेला हिने कविता सादर केली. सूत्रसंचालन ज्योती सावकारे तर आभार दीपाली सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी इतिहास व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.दीपाली पाटील, प्रा.करण भालेराव, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा.माधुरी भुतडा, वरीष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मीना चौधरी, प्रा.निलेश गुरचळ, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.पंकज फालक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन, कनिष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एच.पाटील, प्रा.श्वेता नागला यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !