यावल शहरातील तरुण सहा महिन्यासाठी हद्दपार
Youth from Yaval city deported for six months यावल (28 नोव्हेंबर 2024) : शहरातील श्रीराम नगरातील 22 वर्षीय तरुणाला सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत. आदेशाची अंमलबजावणी यावल पोलिसांनी करीत तरुणाला धुळे जिल्ह्यात सोडले आहे.
तरुण सहा महिन्यांसाठी हद्दपार
यावल शहरात श्रीराम नगरातील रहिवासी सुमित घारु (22) या तरुणाला त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्हे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले. या आदेशाची अंमलबजावणी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, हवालदार वासुदेव मराठे यांनी केली व त्याला ताब्यात घेऊन धुळे जिल्ह्यात त्याच्या एका नातेवाईकाकडे सोडले आहे व त्याला सहा महिन्यासाठी जिल्ह्यात प्रवेश बंदीच्या सूचना करण्यात आल्या.